Pages

रविवार, १९ मार्च, २०२३

जुनी पेन्शन मागणी संदर्भात माहिती

 ही हक्काची लढाई


सद्या सरकारी कर्मचारी संपावर आहेत याच बातमीने जोर धरलाय ... पण त्याचवेळेस कर्मचारी आणि सामान्य माणूस यांच्यात दरी निर्माण करण्याचे काम काही संधीसाधू लोकं करत आहेत......कर्मचारी म्हणजे पांढरा हत्ती त्याला वेळीच आवर घाला म्हणणारे शुरवीर देखील तयार झालेत......पण कर्मचारी म्हणजे परग्रहावरुन आलेले एलियन नाहीत ते देखील शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेले शेतकरी पुत्रच आहेत....म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरानं नोकरी करायचीच नाही का???

       मुळात सरकार एखाद्याला नोकरी देताना विविध परीक्षा ,मुलाखती, परीक्षेतील  गुण अशा बर्याच बाबी तपासून मग नोकरी देते याचा अर्थ, जे संबंधित पदासाठी पात्र आहेत असेच उमेदवार सरकारी नोकरीत रुजू होतात त्यामुळे नोकरी कोण देत नाहीत ती मिळवावी लागते......


     वाचण्यात आलेले काही प्रश्न आणि  एक कर्मचारी म्हणून आपली उत्तरे

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

१)शनिवार -रविवार सुट्टीचा पगार कशासाठी?

उत्तर- सरकार कर्मचारी चालवत नाहीत ते राज्यकर्ते चालवत असतात जर हा पगार देणे घटनेला धरुन नसेल तर तो त्यांनी बंद करावा पण खाजगी नोकऱ्या करतानादेखील घटनेप्रमाणे त्यांनाही पगारी एक सुट्टी असतेच कि.....


२)टेबल खालून पैसा मीळतो का?

उत्तर -यासाठी आपण सगळेच जबाबदार आहोत. एवढा कायदा मजबूत असताना आपण त्याचा वापर करत नाही.... लाच घेणाऱ्याबरोबर देणाराही दोषी


३)वेतन आयोग कशाला हवेत?जर जुनी पेन्शन पाहिजे असेल तर जुन्या पगारानुसार काम करा

उत्तर -अगदी बरोबर आहे....पण पगारवाढ ही महागाईवर ठरते आणि महागाई ही सरकारी धोरणानुसार कमीजास्त होत असते....आम्ही जुन्या पगारावरच काम करु हो... पण शासनाला जुन्याप्रमाणे महागाई कमी करणे शक्य आहे का??


४)ह्यांची पोरं इंग्लिश मिडियमला आणि शेतकरी भावाची पोरं सरकारी शाळेत दुपरचा पिवळा भात खायला

उत्तर -प्रश्नच चुकिचा आहे....कारण कुणी कुठं शिकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे....पण तूम्ही म्हणताय तसं सगळ्यांचीच मुलं सरकारी शाळेत शिकली पाहीजेत या मताशी कुणीही सहमत होईल पण असा कायदा करायची जबाबदारी कुणाची??,

    आणि फक्त कर्मचाऱ्यांचीच का???? सर्व पुढारी, नेते ,मंत्री यांची मुलं नसावीत का सरकारी शाळेत.....?,मा.मंत्र्यांपासून शिपाईपर्यंत सर्वांची मुलं एकाच छताखाली शिकावीत असा कायदा करा की.....मग शिक्षणावरचा पालकांकडून होणारा वायफळ खर्च कमी होईल....नाही का

    आणि शाळेत पिवळा भात हा मेणू शिक्षक  ठरवत नाही एवढंतरी ज्ञान असायला पाहिजे.....सरकारी सुचनेनुसारच मेनू असतो....


५)ह्यांच्या पोरांना इंजिनीअरींग ,मेडिकल काॕलेजला एडमिशन घेणार आणि आमची पोरं बीए,बीकाॕम करत घरी बसणार

उत्तर - मुलांची गुणवत्ता ठरवत असते कुणी कुठे अॕडमिशन घ्यायचं...... शेतकऱ्यांच्या पोटी गुणवत्ता जन्माला येत नाही हे म्हणायचं आहे का तुम्हाला??? जि.प.शाळेतून ,सरकारी शाळेतून हजारो अधिकारी पदाधिकारी तयार झालेत अशी अनेक उदाहरणे कशी  विसरता येईल......नाणं खणखणीत असेल तर ते कुठही  वाजतच हो


६)आम्ही रात्रंदिवस उन्हातान्हात काम करणार,रात्रीच्या वेळेस बिबट्या ,साप यांची भिती बाळगून आयुष्यभर काम करणार....! 

उत्तर -भर उन्हात शेतकरी बाप राबताना बघून एक ध्येयवेडा मुलगा अधिकारी होतो याचा अर्थ  शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज झालं असं होत नाही का??? शेतकरी महत्त्वाचा नाही  असं कोण म्हणणार नाही......शेतकऱ्यांनाही पेन्शन दिली तर आमची ना नाही आहे....शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा पण याला शासकीय कर्मचारी जबाबदार आहे का????प्रत्येक व्यवसायातील धोका हा स्विकारावाच लागतो......दिवसभर शेतीतील वीज चालू ठेवली तर शेतकरी कशाला जाईल रात्री पाणी पाजायला.....मग वीज वेळेत मिळत नाही यालाही आम्हीच जबाबदार का????


       कर्मचाऱ्यांचा द्वेष करुन काहीजन काहीतरी बीनबुडाचं लिहीत असतात......सरकारी धोरणं ,समाज आणि सरकारी कर्मचारी यांचं अतूट नातं आहे.....प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो....आपल्या हक्कासाठी कुणी लढत असेल तर त्याला सहकार्य करणं जमत नसेल तर किमान बुनबुडाचे आरोप करुन त्याचं मनोबल कमी तरी करु नका.......आम्ही कर्मचारी याच समाजाचा अविभाज्य घटक आहोत मग आम्ही आमच्या हक्कासाठी लढलो तर चुकीचे ठरलोका???

          जुनी पेन्शन मिळणार कि नाही हे वेळ ठरवेल पण हक्कासाठी  लढणं आमच्या हातात आहे मग आम्ही लढणारच.....स्वराज्यसंस्थापक, आमचे दैवत छत्रपती शिवाजी राजे,शाहु फुले आंबेडकर यांचा इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो आणि मोठे झालो मग त्यांचा आदर्श ठेऊन आमच्या हक्कासाठी संवैधानिक लढाई आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा 


एकच मिशन जुनी पेन्शन

मायबाप सरकार नक्कीच योग्य निर्णय  घेतील

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा