Pages

सोमवार, २० मार्च, २०२३

मुंबई उच्च न्यायालयाचे वरिष्ठ वकील डी. के. श्रीवास्तव यांनी लिहिलेल्या या पोस्टमुळे तुमचे ज्ञान वाढेल.*

 *

 *खूप खूप महत्वाचे..* 

 *काय भारताची व्यवस्था?* 

 *सामान्य जनतेची फसवणूक?* 

😔😖😠🥵🥵😡

तुम्हीच बघा....

    

 1 - नेत्याची इच्छा असेल तर एकाच वेळी दोन जागांवर निवडणुका लढू शकतो! परंतु...

      तुम्ही दोन ठिकाणी मतदान करु शकत नाही.


२ - तुरुंगात असाल तर मतदान करू शकत नाही.

पण

नेता तुरुंगात असताना निवडणूक लढवू शकतो.

🤬😠🥵😖😔😔😔

3 - तुम्ही कधी तुरुंगात गेलात तर तुम्हाला आयुष्यभर सरकारी नोकरी मिळणार नाही.


परंतु……

एखाद्या नेत्याला खून किंवा बलात्काराच्या आरोपात कितीही वेळा तुरुंगवास झाला असला तरी तो पंतप्रधान किंवा राष्ट्रपती होऊ शकतो, त्याला पाहिजे तोपर्यंत.


4 - बँकेत माफक नोकरी मिळवण्यासाठी

 तुम्ही पदवीधर असावेत..


परंतु,

नेत्याच्या अंगठ्याचा ठसा असला तरी तो भारताचा अर्थमंत्री होऊ शकतो.

🤬😡😖🥵

5 - तुम्ही सैन्यात अल्पवयीन असणे आवश्यक आहे.

 शिपायाची नोकरी मिळवण्यासाठी 10 किलोमीटर धावून पदवी दाखवावी लागते.


 परंतु....

 नेता अशिक्षित-भ्याड आणि लुळा -पांगळा असेल तरीही ते लष्कर, नौदल आणि हवाई दलाचे प्रमुख म्हणजेच संरक्षण मंत्री होऊ शकतात.

🤬😡🥵😠🥵

 आणि

 ज्याचे संपूर्ण कुटुंब आजपर्यंत एकाही शाळेत गेले नाही.. तो नेता देशाचा शिक्षणमंत्री होऊ शकतो.


 आणि

 ज्या नेत्यावर हजारो खटले सुरू आहेत.

 तो नेता पोलिस खात्याचा प्रमुख, म्हणजेच गृहमंत्री होऊ शकतो.

🥵🥵🥵🤬😖😠

 तर

 ही व्यवस्था बदलली पाहिजे असे वाटते का?

नेता आणि जनता या दोघांसाठी एकच कायदा असावा.

 तर

कृपया हा मेसेज फॉरवर्ड करून देशात जनजागृती करण्यासाठी तुमचा पाठिंबा द्या.


 जर तुम्ही फॉरवर्ड केले नाही तर कोणत्याही नेत्याला दोष देऊ नका.

तसे न केल्यास नुकसानीस तुम्ही जबाबदार असाल.


30 ते 35 वर्षांच्या समाधानकारक सेवेनंतरही सरकारी कर्मचाऱ्याला पेन्शन मिळत नाही? आमदार/खासदार पेन्शनचा न्याय कुठे आहे फक्त ५ वर्षांसाठी...? 


 

 *श्री. डी. के. श्रीवास्तव* 

 *मुख्य सरकारी वकील** 

 *मुंबई उच्च न्यायालय.* 

 *मुंबई.....* 


*ही मोहीम पुढे न्या. हटवू 

नका, आपल्याला ही व्यवस्था बदलण्याची गरज आहे.* 🚩🍃🌱👏👏🙏🏻🌹💥 *जय हिंद जय भारत*

रविवार, १९ मार्च, २०२३

 नवरा मेला तरी बेहत्तर, पण सवत रंडकी (विधवा )झाली पाहिजे...!!

     काल जुनी पेंशन---   नवी पेंशन च्या नादात सरकारने सरकारी नोकऱ्याच बंद कारण्याचा gr काढला सुद्धा. सरकारी कर्मचाऱ्यांची Whats app वर जिरावता -जिरावता  आपल्या मुलाबाळाचे भविष्य सरकारने धुळीस मिळवले आहे. सध्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन च्या मागणीसाठी  संप पुकारलेला आहे . संपाच्या निमित्ताने सामान्य नागरिकांना याची घृणा वाटणे साहजिक आहे.  त्यांना कोणत्याही प्रकारचा दोष आम्ही देणार नाही. नकारात्मक ईर्षा ही मानवी सहजप्रवृत्ती आहे. राज्यकर्त्याना नेमकं हेच हवं असतं,मग ते कोणत्याही पक्षाचे असोत.

    मुळात सर्वसामान्य जनतेने खोलात जाऊन विचार करणे गरजेचे आहे.


1) शासकीय कर्मचारी वेतांनावर होणारा खर्च हा या 'फडणवीस साहेबांच्या' अधिकृत बजेट नुसार 37% च्या आसपास आहे... वेतन खर्च हा खरं तर Investment to process असतो....कारण

अ ) रिक्षाचालकास रिक्षा चालवून कामाई करायची असेल तर पेट्रोल तर भरावेच लागेल नं!

आ) शेतकऱ्यांनाही माशागत पेरणी फवारणी, निंदन यासाठी उत्पादन खर्च करावाच लागतो.

इ )व्यापाऱ्यालाही प्रथम व्यापारात गुंतवणूक करावी लागते..

               

             हा खर्च इन्व्हेस्टमेंट टू प्रोसेस असतो. तसाच शासन चालवण्याचा खर्च म्हणजेच वेतन खर्च असतो. आणि शेतीचा माशागत खर्च हा "पांढरा हत्ती" पोसने- वैगरे काही नसतो, तो आवश्यक खर्च असतो


             आणि हा खर्च अधिकृत पणे 40% च्या आत आहे. कर्मचाऱ्याच्या पगारामूळे राज्य कर्जबाजारी होणार हा Social media दावा धादान्त चुकीचा आहे *


2) इमानदारीने टॅक्स भरून, 12 महिने कामाच्या बदल्यात 10 महिन्याचा पगार सरकारी कर्मचारी घेतो


3) या टॅक्सच्या रूपात दिलेला पैसा  शेतकरी कर्जमाफी, शेती नुकसान भरपाई, 1 रुपये किलो गहू तांदूळ सारख्या लोक-कल्याणकारी योजनामध्ये उपयोगात येतो. याला कोणताही कर्मचारी विरोध करीत नाही.


4) शासकीय सेवेत येण्यासाठी विशिष्ट बौद्धिक, शैक्षणिक पात्रता व योग्यता लागते.        

( MD  सर्जन डॉक्टर हात लावला तरी 1000/- रु फी घेतात. कारण ही फी सादर डॉक्टरांच्या ज्ञानाची व कौशल्यची असते )


5) कर्मचारी भ्रष्टाचार करत असेल तर त्याच्या सर्व संपत्तीचा लिलाव करून त्याची संपत्ती सरकार जमा करावी. त्याच्या आपत्यांना शासकीय  सेवेसाठी अपात्र ठरवावे.  परंतु असले 10% भ्रष्टाचारी कर्मचारी,  पेंशन नाकारण्याचे कारण होऊ शकत नाहीत.


6) शासकीय कामात दिरंगाई होतं असेल तर सेवा हमी कायदा अधिक कडक करावा. कामचुकार कर्मचाऱ्यावर कारवाई करावी. परंतु ही प्रशासकीय बाब देखील 90% इमादारीने काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचे हक्काचे पेंशन नाकारण्याचे कारण असू शकत नाही


7)शेतकऱ्यांना पेंशन देऊ नका, त्यांचे घराचे प्लास्टर करू नका, त्यांचे उत्पन्न वाढवू नका असे कधी कोणताच शासकीय कर्मचारी कधीच  बोलला नाही....!! त्यासाठी योग्य शासकीय धोरण यावे, यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे. राजकीय अपयशासाठी कर्मचारी जवाबदार नाहीत..


8) पोलीस, शिक्षक, ग्रामसेवक, तलाठी, आरोग्य सेवक, कृषिसहाय्यक, हे कुणी मोठया श्रीमंत घराण्यातून आलेले नसतात. ती शेताऱ्यांचीच मुलं आहेत. श्रीमंत लोक अशा नोकऱ्यांकडे फिरकतही नाहीत.


9)आमदार खासदारांना पेंशन आहे म्हणून आम्हाला द्या.. असे म्हणणे सरमजामशाई असेल कदाचित, परंतु आम्हाला नाही म्हणून -- म्हणून यांचीही बंद करा.. ( आम्हाला यांची मजा पाहायाची आहे ) ही भावनाही चुकीचीच आहे ना!!


10) नोकरी मिळवण्यासाठी परिस्थितीशी झगडून, चांगले शिक्षण घेऊन उच्च स्पर्धा परीक्षांची तयारी करून  कर्मचारी म्हणून सेवेत दाखल झाले आहेत.


11)काही म्हणतात, सध्या अनेक बेरोजगार तरुण निम्म्या पगारावर राबायला तयार आहेत (अन् सरकारलाही हेच हवं आहे) आपल्या मुलांना देश विदेशात अतिउच्च शिक्षण देऊन सर्वसामान्यांच्या मुलांना वेठबिगार म्हणून राबवायला आणि निवडणुकीत जय म्हणत पाठीमागे फिरवायला ही नेतेमंडळी तयार आहेत.


12) रोजगार उपलब्ध करून देणे , आणि नागरिकांचे जीवनमान उंचावणे ही शासनकर्त्यांची जबाबदारी आहे.


13)वाढती बेरोजगारी ही सरकारची निष्क्रियता  आहे.यासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना जबाबदार धरणे शुद्ध मुर्खपणा आहे.


14) कर्मचारी भरती न करणे म्हणजे शिक्षण, आरोग्य, सारख्या प्राथमिक सेवा ज्या, सरकारची जबाबदारी आहे त्या मोडीत निघाल्या तर सामान्य जनतेचे काय हाल होतील हे आपण कोरोना काळात अनुभवलं आहे. खाजगी दवाखान्यात काय लूट झाली ती नव्याने सांगण्याची गरज नाही.


15)अलिकडे सर्वच सरकारी  खात्यात भरती झाली नाही, या भरतीत सर्वसामान्यांचीच मुले उतरली असती.


16) कंत्राटीकरणाचे काय तोटे होतात ते बीएसएनएल च्या तुलनेत जिओ ची मनमानी कशी सुरु आहे हे सुज्ञास सांगावी लागणार नाही.


17)) सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार आणि पेन्शन हा महत्त्वाचा मुद्दा विशेष चर्चेत घेतला जातो पण अर्थतज्ज्ञांच्या मते (सरकार धार्जिणे सोडून)भारतीय बाजारात जी स्थिरता आहे त्यास कर्मचार-यांचे पगारही कारणीभुत आहेत.


18) सरकारी कर्मचा-याकडील पगार अथवा पेन्शन चा पैसा हा भारतीय बाजारपेठेत भाजीवाला,दुधवाला , दुकानदार, छोटे मोठे व्यावसायिक यांच्याकडेच फिरत राहतो.

(सरकारी कर्मचाऱ्यांनी पैशाच्या जोरावर परदेशात उद्योग, इस्टेट उभा केल्याचे ऐकिवात नाही.)


19))सरकारने शेतकऱ्यांसाठीही विविध योजना( मोफत वीज, शेतमालाला हमीभाव इ.) राबवाव्यात.उद्योगपतींची हजारो कोटींची कर्जे माफ  करण्यापेक्षा, किंवा ती बुडवण्यापेक्षा चांगले)


20) सरकारी कर्मचारी हा वर्ग बाजुला पडला तर भविष्यात देशात दोनच वर्ग निर्माण होतील ते म्हणजे अतिश्रीमंत आणि आणि अतिगरिब या दोघांना जोडणारा मध्यमवर्ग निघून जाईल.


21) सर्वसामान्य जनतेने यासाठी आपापसात न भांडता परस्परांना समजून घेणे फायद्याचे आहे नाहीतर म्हातारी मेल्याचे दुःख नाही तर.... खाजगीकरणाचा काळ सोकावेल.


22) सततची नापिकी, गरिबी, दारिद्र यातून बाहेर पडण्यासाठी आपल्यासारख्या सर्वसामाण्याना, आपल्या मुलांना, जावायाला, नातवांना सरकारी नोकरी हाच आजतरी खात्रीलायक हाच राजमार्ग आहे.   (जो बंद कर्मचाऱ्यांची जिरवता जिरवता बंद केला गेलाय )


                आणि आश्चर्य याच वाटतंय, की याविरुद्ध कोणाला काहीच वाटतं नाही... कारण....


""नवरा मेला तरी बेहत्तर, पण सवत रंडकी झाली पाहिजे""

जुनी पेन्शन मागणी संदर्भात माहिती

 ही हक्काची लढाई


सद्या सरकारी कर्मचारी संपावर आहेत याच बातमीने जोर धरलाय ... पण त्याचवेळेस कर्मचारी आणि सामान्य माणूस यांच्यात दरी निर्माण करण्याचे काम काही संधीसाधू लोकं करत आहेत......कर्मचारी म्हणजे पांढरा हत्ती त्याला वेळीच आवर घाला म्हणणारे शुरवीर देखील तयार झालेत......पण कर्मचारी म्हणजे परग्रहावरुन आलेले एलियन नाहीत ते देखील शेतकऱ्यांच्या घरात जन्माला आलेले शेतकरी पुत्रच आहेत....म्हणजे शेतकऱ्यांच्या पोरानं नोकरी करायचीच नाही का???

       मुळात सरकार एखाद्याला नोकरी देताना विविध परीक्षा ,मुलाखती, परीक्षेतील  गुण अशा बर्याच बाबी तपासून मग नोकरी देते याचा अर्थ, जे संबंधित पदासाठी पात्र आहेत असेच उमेदवार सरकारी नोकरीत रुजू होतात त्यामुळे नोकरी कोण देत नाहीत ती मिळवावी लागते......


     वाचण्यात आलेले काही प्रश्न आणि  एक कर्मचारी म्हणून आपली उत्तरे

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

१)शनिवार -रविवार सुट्टीचा पगार कशासाठी?

उत्तर- सरकार कर्मचारी चालवत नाहीत ते राज्यकर्ते चालवत असतात जर हा पगार देणे घटनेला धरुन नसेल तर तो त्यांनी बंद करावा पण खाजगी नोकऱ्या करतानादेखील घटनेप्रमाणे त्यांनाही पगारी एक सुट्टी असतेच कि.....


२)टेबल खालून पैसा मीळतो का?

उत्तर -यासाठी आपण सगळेच जबाबदार आहोत. एवढा कायदा मजबूत असताना आपण त्याचा वापर करत नाही.... लाच घेणाऱ्याबरोबर देणाराही दोषी


३)वेतन आयोग कशाला हवेत?जर जुनी पेन्शन पाहिजे असेल तर जुन्या पगारानुसार काम करा

उत्तर -अगदी बरोबर आहे....पण पगारवाढ ही महागाईवर ठरते आणि महागाई ही सरकारी धोरणानुसार कमीजास्त होत असते....आम्ही जुन्या पगारावरच काम करु हो... पण शासनाला जुन्याप्रमाणे महागाई कमी करणे शक्य आहे का??


४)ह्यांची पोरं इंग्लिश मिडियमला आणि शेतकरी भावाची पोरं सरकारी शाळेत दुपरचा पिवळा भात खायला

उत्तर -प्रश्नच चुकिचा आहे....कारण कुणी कुठं शिकावं हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे....पण तूम्ही म्हणताय तसं सगळ्यांचीच मुलं सरकारी शाळेत शिकली पाहीजेत या मताशी कुणीही सहमत होईल पण असा कायदा करायची जबाबदारी कुणाची??,

    आणि फक्त कर्मचाऱ्यांचीच का???? सर्व पुढारी, नेते ,मंत्री यांची मुलं नसावीत का सरकारी शाळेत.....?,मा.मंत्र्यांपासून शिपाईपर्यंत सर्वांची मुलं एकाच छताखाली शिकावीत असा कायदा करा की.....मग शिक्षणावरचा पालकांकडून होणारा वायफळ खर्च कमी होईल....नाही का

    आणि शाळेत पिवळा भात हा मेणू शिक्षक  ठरवत नाही एवढंतरी ज्ञान असायला पाहिजे.....सरकारी सुचनेनुसारच मेनू असतो....


५)ह्यांच्या पोरांना इंजिनीअरींग ,मेडिकल काॕलेजला एडमिशन घेणार आणि आमची पोरं बीए,बीकाॕम करत घरी बसणार

उत्तर - मुलांची गुणवत्ता ठरवत असते कुणी कुठे अॕडमिशन घ्यायचं...... शेतकऱ्यांच्या पोटी गुणवत्ता जन्माला येत नाही हे म्हणायचं आहे का तुम्हाला??? जि.प.शाळेतून ,सरकारी शाळेतून हजारो अधिकारी पदाधिकारी तयार झालेत अशी अनेक उदाहरणे कशी  विसरता येईल......नाणं खणखणीत असेल तर ते कुठही  वाजतच हो


६)आम्ही रात्रंदिवस उन्हातान्हात काम करणार,रात्रीच्या वेळेस बिबट्या ,साप यांची भिती बाळगून आयुष्यभर काम करणार....! 

उत्तर -भर उन्हात शेतकरी बाप राबताना बघून एक ध्येयवेडा मुलगा अधिकारी होतो याचा अर्थ  शेतकऱ्यांच्या कष्टाचं चीज झालं असं होत नाही का??? शेतकरी महत्त्वाचा नाही  असं कोण म्हणणार नाही......शेतकऱ्यांनाही पेन्शन दिली तर आमची ना नाही आहे....शेतकऱ्यांच्या शेतीमालाला योग्य भाव मिळायला हवा पण याला शासकीय कर्मचारी जबाबदार आहे का????प्रत्येक व्यवसायातील धोका हा स्विकारावाच लागतो......दिवसभर शेतीतील वीज चालू ठेवली तर शेतकरी कशाला जाईल रात्री पाणी पाजायला.....मग वीज वेळेत मिळत नाही यालाही आम्हीच जबाबदार का????


       कर्मचाऱ्यांचा द्वेष करुन काहीजन काहीतरी बीनबुडाचं लिहीत असतात......सरकारी धोरणं ,समाज आणि सरकारी कर्मचारी यांचं अतूट नातं आहे.....प्रत्येक घटक महत्त्वाचा असतो....आपल्या हक्कासाठी कुणी लढत असेल तर त्याला सहकार्य करणं जमत नसेल तर किमान बुनबुडाचे आरोप करुन त्याचं मनोबल कमी तरी करु नका.......आम्ही कर्मचारी याच समाजाचा अविभाज्य घटक आहोत मग आम्ही आमच्या हक्कासाठी लढलो तर चुकीचे ठरलोका???

          जुनी पेन्शन मिळणार कि नाही हे वेळ ठरवेल पण हक्कासाठी  लढणं आमच्या हातात आहे मग आम्ही लढणारच.....स्वराज्यसंस्थापक, आमचे दैवत छत्रपती शिवाजी राजे,शाहु फुले आंबेडकर यांचा इतिहास असणाऱ्या महाराष्ट्रात आम्ही जन्मलो आणि मोठे झालो मग त्यांचा आदर्श ठेऊन आमच्या हक्कासाठी संवैधानिक लढाई आम्ही लढणार आणि जिंकणार सुद्धा 


एकच मिशन जुनी पेन्शन

मायबाप सरकार नक्कीच योग्य निर्णय  घेतील